IPL 2024 , CSK vs KKR Match Live Score Updates : आज आयपीएलच्या 22 व्या सामन्यात पाच वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने-सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत चेन्नई सुपर किंग्जने सलग दोन पराभवांनंतर विजय मिळवला आहे. यासह कोलकाता नाईट रायडर्सचा विजयीरथ देखील चेन्नई सुपर किंग्जने रोखला आहे.
रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या अप्रतिम गोलंदाजी आणि कर्णधार रुतुराज गायकवाडच्या 58 चेंडूंत नऊ चौकारांच्या मदतीने केलेल्या नाबाद 67 धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सात गडी राखून पराभव केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर, चेन्नईने आपल्या घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर परतले, तर केकेआरला या हंगामात पहिला पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 9 गडी गमावून 139 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईने 17.4 षटकांत 3 गडी गमावत 141 धावा करून सामना जिंकला.
विजयासाठी 138 धावांचा पाठलाग करताना चेन्नईला पहिला धक्का 27 धावसंख्येवर बसला. केकेआरचा गोलंदाज वैभव अरोरा याने चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सीएसकेचा सलामीवीर रचिन रवींद्रला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. रचिन आठ चेंडूत 15 धावा करून बाद झाला. त्यानंतर 13व्या षटकात केकेआरचा फिरकीपटू सुनील नरेनने डेरिल मिशेलला बाद करून सीएसकेला 97 धावसंख्येवर दुसरा धक्का दिला. मात्र तोपर्यंत सामना पूर्णपणे चेन्नईच्या हातात गेला होता. मिशेल 19 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. त्याआधी CSK कर्णधार रुतुराज गायवाडने KKR विरुद्ध शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते.
त्यानंतर सीएसकेला विजयासाठी 19 चेंडूत तीन धावांची आवश्यकता असताना शिवम दुबेला बाद करून वैभव अरोराने केकेआरला तिसरे यश मिळवून दिले. शिवम दुबे 18 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. कर्णधार गायकवाडने 58 चेंडूत 67 धावांची नाबाद मॅचविनिंग इनिंग खेळली. एमएस धोनी 1 धाव काढून नाबाद राहिला. सुनील नरेन आणि वैभव अरोरा यांच्याशिवाय केकेआरच्या एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही. वैभवने 2 तर नरेन याने 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात प्रथम खेळताना 137 धावा केल्या. कोलकातासाठी सलामीवीर सुनील नरेन यावेळी काही खास चमक दाखवू शकला नाही, तो 20 चेंडूत 27 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. केकेआरकडून सर्वाधिक धावा कर्णधार श्रेयस अय्यरने केल्या, ज्याने 32 चेंडूत 34 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून उत्कृष्ट गोलंदाजी झाली. फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या प्रत्येकी तीन बळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 9 बाद 137 धावांवर रोखले.
Innings Break ‼️
Some tight & disciplined bowling from Chennai Super Kings restrict #KKR to 137/9.
Will it be defended or #CSK register another win at home 🤔
Scorecard ▶ https://t.co/5lVdJVscV0 #TATAIPL | #CSKvKKR pic.twitter.com/zUR3IMuOeS
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2024
कोलकाता नाईट रायडर्सचे फलंदाज पहिल्या 10 षटकांमध्ये खूप संघर्ष करताना दिसले. संघाने 64 धावांच्या स्कोअरवर 4 विकेट गमावल्या होत्या, परंतु त्यानंतरही त्यांच्यासाठी परिस्थिती सुधारली नाही. परिस्थिती अशी होती की पुढील 5 षटकांत संघाला केवळ 29 धावा करता आल्या कारण 15 षटकांनंतर KKR ची धावसंख्या 5 विकेटवर 99 धावा होती. शेवटच्या 5 षटकांमध्ये श्रेयस अय्यर (34), आंद्रे रसेल (10) आणि रिंकू सिंग (13) यांनीही मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले आणि बाद झाले.
अंगकृश रघुवंशीने 18 चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावांचे योगदान दिले. केकेआरसाठी नरेन आणि रघुवंशी यांच्यात केवळ अर्धशतकी (56) भागीदारी झाली आणि ही भागीदारी तुटल्यानंतर केकेआरची फलंदाजी पूर्णपणे विस्कळीत झाली आणि शेवटपर्यंत पुनरागमन करू शकली नाही. श्रेयस अय्यर शेवटच्या षटकापर्यंत क्रीजवर राहिला, पण संघाला 150 धावांपर्यंत नेऊ शकला नाही. कोलकात्याच्या फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकात 42 धावा करता आल्या.
Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…
CSK ची तगडी गोलंदाजी….
चेन्नई सुपर किंग्जकडून अतिशय तगडी गोलंदाजी होती. कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टच्या रूपाने धक्का बसला. केकेआरच्या सलामीवीर सॉल्टला तुषार देशपांडेने खाते न उघडता माघारी धाडलं. फिलिप सॉल्ट त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने 4 षटकात केवळ 18 धावा देत 3 महत्त्वपूर्ण बळी घेत आपल्या फिरकीने कहर केला. महिष टेकशासमोरही केकेआरच्या फलंदाजांना धावा काढणे कठीण झाले. त्याने 4 षटकात 28 धावा देत एक विकेट घेतली. KKR विरुद्धच्या सामन्यात 3 बळी घेणाऱ्या तुषार देशपांडेची गोलंदाजी प्रत्येक सामन्यात मारक ठरत आहे. IPL 2024 मध्ये पहिला सामना खेळणारा शार्दुल ठाकूर काही खास चमक दाखवू शकला नाही. शेवटच्या षटकात मुस्तफिझूर रहमानने 2 बळी घेत KKRच्या खालच्या फळीतील फलंदाजीचे कंबरडे मोडले आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आला आहे.