बंगळुरूचा विजयासाठी आटापिटा; आव्हान कायम राखण्यास कोलकाताला विजय आवश्‍यक

-रसेलला रोखण्यास बंगळुरूला रणनीती आखण्याची गरज
-पराभव झाल्यास बंगळुरूचे आव्हान संपुष्टात येणार

कोलकाता – आयपीएलच्या बाराव्या मोसमातील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असणार असून आजच्या सामन्यात पराभूत झाल्यास बंगळुरूचे आव्हान संपुष्टात येणार असून बंगळुरूचा पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास कोलकाताचा संघ उत्सुक असणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – ईडन गार्डन मैदान, कोलकाता

यंदाच्या मोसमात कोलकाताच्या संघाने आठ सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा फटका बसला होता. त्यामुळे त्यांचे आठ गुण झाले असून ते सध्या क्रमवारीत सहाव्या स्थानी आहेत. कोलकाताने आपल्या आठ सामन्यांपैकी सनरायजर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे.

तर, त्यांना दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज या संघांविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना क्रमवारीत सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले असून आजचा सामना जिंकत पराभवाच्या छायेतून बाहेर पडत स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यास कोलकाता संघ उत्सुक असणार आहे.

तर, दुसरीकडे यंदाच्या मोसमात केवळ एकच सामना जिंकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्य संघाला स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवायचे असल्यास आगामी सहाही सामन्यात विजय मिळवणे आवश्‍यक असून त्यांनी आज पराभव पत्करल्यास त्यांचे

स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात येणार आहे. बंगळुरूने केवळ किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्धचा सामना जिंकून स्पर्धेत पुनरागमन केले होते, मात्र, त्यानंतरच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा धक्‍का बसला.
यावेळी बंगळुरू आणि कोलकाता दरम्यान झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाताच्या संघातील आंद्रे रसेलने 13 चेंडूत 1 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी करत 48 धावा करून अखेरच्या दोन षटकांमध्ये संघाला विजय मिळवून दिला होता.

त्यामुळे बंगळुरूच्या हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास कोलकाताने हिरावला होता. यावेळी त्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने 20 षटकांत 211 धावांची मजल मारली होती. यावेळी त्यांच्य संघाकडून विराट कोहली, ए. बी. डीव्हिलियर्स आणि मार्कस स्टोइनिसने धमाकेदार फलंदाजी केली होती. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांच्या संघातील गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतात यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून असून त्यांना आंद्रे रसेलला रोखण्यासाठी विशेष रणनीती आखण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, नेथन कुल्टर-नाईल, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.