चुकून ‘बसपा’ ऐवजी ‘भाजप’ला मत दिल्याने मतदाराने कापले स्वतःचे बोट 

उत्तर प्रदेश: देशभरात लोकसभा निवडणुकीचा माहोल सुरु असनू देशभरातील ९५ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर मतदारसंघाचाही यामध्ये समावेश होता. दरम्यान, एका मतदाराने चुकून भाजपला मतदान केल्यामुळे स्वतःचे बोट कापले. सदर मतदाराला मायावती यांच्या बहुजन समाज पक्ष्याच्या उमेदवाराला मतदान करायचे होते.

बुलंदशहरमध्ये सध्याचे भाजपा खासदार भोला सिंग आणि सपा-बसपा-राजद युतीचे योगेश वर्मा यांच्यामध्ये थेट लढत रंगली आहे. शिकापूरमधील हुलासन गावात राहणाऱ्या २५ वर्षीय पवन कुमार हे बहुजन समाज पार्टीचे समर्थक आहेत. पवन कुमार यांनी मतदानाला जाण्यापूर्वी सपा-बसपासाठीचे उमेदवार योगेश शर्मा यांना मत देण्याचा निश्चय केला होता. मात्र मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर पवन यांनी अतिउत्साहाच्या भरात बसपासमोर बटण न दाबता भाजपसमोरील बटण दाबले. त्यामुळे त्यांचे मत भाजपचे उमेदवार भोला सिंह यांना गेले.

मतदान करताना झालेल्या  चुकीमुळे पवन स्वत:वरच खूप संतापला. मतदान करुन घरी आल्यानंतर रागाच्या भरात त्याने स्वत:चे बोट कापले. पवन याने एक व्हिडिओ ट्विटवर पोस्ट करुन यासंदर्भातील माहिती दिली.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.