कोल्हापूर : कोल्हापुरात पोलिसांनी केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आज एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आणि कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल मधील रक्ताची कमतरता लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील कळे पोलीस ठाण्याच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या रक्तदान शिबिरात पोलिसांबरोबरच कळे परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी मोठा सहभाग नोंदवला. कळे पोलीस ठाण्याच्या आवारात आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 153 रक्तदात्यांनी रक्तदान केलं. यावेळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश देसाई यांनी शिबिरांमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांना रक्तदान संदर्भात जागृती निर्माण होण्याकरिता मार्गदर्शन केलं