जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आज संयुक्त राष्ट्र संघाकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतामध्ये करण्यात आलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये हात असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करावे यासाठी भारत गेल्या दहा वर्षांपासून प्रयत्नशील होता मात्र दरवेळी भारताच्या या मागणीला चीनकडून खोडा घातला जात होता. परंतु आज संयुक्त राष्ट्र संघातर्फे मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्याने हा भारताचा मोठा कूटनीतिक विजय असल्याचं मानलं जात आहे.
दरम्यान, मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याबाबत भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “भारताचा मसूद अजहर बाबतचा दावा आज खऱ्या अर्थाने सिद्ध झाला. मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं आहे. भारत सुरक्षित हातांमध्ये असून संयुक्त राष्ट्रांचा हा निर्णय म्हणजे पंतप्रधानांच्या परराष्ट्र धोरणाचा मोठा विजय आहे.
मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याबाबत भारताचे संयुक्त राष्ट्र संघाचे राजदूत सईद अकबरुद्दीन यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली असून ते लिहितात, “छोट्या-मोठ्या अशा सर्वच राष्ट्रांनी एकत्र येऊन आज मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलं. सर्वांच्या सहकार्यासाठी धन्यवाद”
India stands vindicated. Masood Azhar is now a global terrorist. India is in safe hands. This marks a high point for the Prime Minister’s foreign policy.
— Arun Jaitley (@arunjaitley) May 1, 2019