कोल्हापूर – कोल्हापूर शहर आणि ग्रामीण परिसरात पावसाची संततधार चालू आहे. पन्हाळा तालुक्यातील मौजे पोहाळवाडी गावात कृषी विभागाचा छोटा माती नाला बंधारा खचून फुटला आहे, त्यामुळे बंधाराजवळचे जवळपास 2 एकर शेतीचे क्षेत्र वाहून जाऊन आर्थिक नुकसान झाले आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी शेतीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिली आहे.