मान्सून ऑफर्सचा लाभ घ्या (भाग-1)

कधी कधी पाऊस हा अडचणींसमवेत सवलतीचांही बरसात करणारा ठरतो. जर आपण घर खरेदीची योजना आखत असाल तर मॉन्सूनचा हंगाम हा निश्‍चितच फायदेशीर ठरू शकतो. बिल्डरकडून तयार केल्या जाणाऱ्या घराचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याचा हाच योग्य काळ आहे. त्याचवेळी बॅंका देखील कारभारातील सुस्ती दूर करण्यासाठी गृहकर्जावर काही सवलती बहाल करत आहेत. सध्याच्या काळात बिल्डर आणि बॅंका घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक योजना सादर करत आहेत. या सवलतीचा लाभ घेऊन अधिकाधिक फायदा पदरात पाडून घेऊ शकतो.

बिल्डरचा दावा कितपत योग्य 
बिल्डर कोणताही असो तो घराच्या दर्जाबाबत विविध दावे करत असतो. घर बुक करताना तो ग्राहकांसमोर बांधकामात वापरण्यात येणाऱ्या मटेरियरलची जंत्रीच सादर करतो. परंतु प्रत्यक्षात तो दावा खरा असेलच याची खात्री देता येत नाही. पावसाळ्यात त्याच्या दाव्यातील सत्यता कळते. फ्लॅट किंवा बंगल्याच्या बांधकामातील उणिवा मॉन्सूनच्या दिवसातच कळतात. यावरून कामाचा दर्जा तपासू शकतो. पावसाळ्यात घरात गळती तर होत नाही ना, याचे आकलन करून दाव्यातील सत्यता पडताळू शकतो.

मान्सून ऑफर्सचा लाभ घ्या (भाग-2)

गुणवत्तेची पारख करताना
आपण ज्या गृहकप्रकल्पात घर खरेदी करू इच्छित आहात, त्या घराच्या गुणवत्तेची खरी पारख ही पावसाळ्यातच होते. पावसामुळे भिंतीत ओलावा तर नाही ना, छतात गळती आहे का? इमारतीसमोवर पाणी साचते का, गच्चीवरून किंवा पार्किंगमधून पाण्याचा निचरा योग्यरितीने होतो का नाही, या गोष्टींचे आकलन करता येते. एरव्ही कोरड्या वातावरणात या गोष्टींची उकल होत नाही. याशिवाय पावसाळ्यातच प्लंबिंग कामाच्या दर्जा कळतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×