कोल्हापूर 70.7, हातकणंगले 70.28 टक्के मतदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये मंगळवारी शांततेत व सुरळीतरित्या मतदान पार पडले. यावेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 70.7 टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात 70.28 टक्के मतदान झाले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 74 हजार 345 मतदारांपैकी 9 लाख 57 हजार 183 पुरुष, 9 लाख 17 हजार 143 स्त्रीया व इतर 19 असे मतदार आहेत. यापैकी प्रत्यक्षात 13 लाख 25 हजार 174 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 6 लाख 93 हजार 592 व स्त्रीया 6 लाख 31 हजार 578 यांचा समावेश आहे.

हातकणंगले मतदार संघात 17 लाख 72 हजार 563 मतदार आहेत. यापैकी 9 लाख 14 हजार 363 पुरुष मतदार, 8 लाख 58 हजार 133 स्त्री मतदार व इतर 67 मतदारांचा समावेश आहे. यापैकी 12 लाख 45 हजार 797 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 6 लाख 57 हजार 652 पुरुष, 5 लाख 88 हजार 127 स्त्री व इतर 18 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष 71.92 टक्के, महिला 68.54 टक्के, व इतर 26.87 टक्के असे एकूण 70.28 टक्के मतदान झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.