दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या वन-डे फलंदाजांच्या क्रमवारीमध्ये वर्षाअखेरीस भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (८८७) आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (८७३) यांनी अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळवला आहे.तर पाकिस्तानचा बाबर आझम ८३४ अंकासह तिस-या क्रमांकावर आहे.
ICYMI: Shai Hope entered the top 10 of the @MRFWorldwide ICC ODI Rankings for batting after yesterday's update.
Read more ⬇️https://t.co/gDumZKTsAI
— ICC (@ICC) December 24, 2019
दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्यूप्लेसी ८२० गुणांसह चौथ्या तर न्यूझीलंडचा राॅस टेलरचा ८१७ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर क्रमवारीत वेस्ट इंडिजच्या शाइ होपने पाच स्थानांची झेप घेत ७८२ गुणांसह ९ वे स्थान पटकावले आहे. शाइ होपने भारताविरूध्दच्या वनडे मालिकेत २२२ धावा केल्या होत्या, त्याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला.
वेस्ट इंडिजविरूध्दच्या मालिकेत १८५ धावा करणारा भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने क्रमवारीत १७ स्थानांची झेप घेत ७१ वा तर याच मालिकेत श्रेयस अय्यरने १३० धावा करत १०४ व्या स्थानावरून ८१ वे स्थान पटकावले आहे.