लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकभवन येथे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आनंदी बेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
हा पुतळा राज्याच्या सांस्कृतिक विभागाने बनविला आहे. या पुतळ्याची निर्मिती जयपूरमध्ये करण्यात आली आहे. पुतळा उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारला 89.60 लाख रुपये खर्च आला आहे. अटलबिहारी वाजपेयी हे लखनऊचे खासदार होते. आज त्यांची 95 वी जयंती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सीजी सिटीमध्ये स्थापन होणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय विद्यापीठाची पायाभरणी केली. राज्य सरकारने या विद्यापीठासाठी 50 एकर जागा हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनऊत आले आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह इतर मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांच्या कार्यक्रमासंदर्भात प्रशासन सतर्क असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.