मुंबई : वेगवान गोलंदाज अशोक दिंडाला रणजी संघातून वगळण्यात आले आहे. गोलंदाजीचे प्रशिक्षक रणदीप बोस यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी डिंडाला संघातून वगळण्यात आले. क्रिकेटपटू दिंडाने बोस यांना शिवीगाळकरीत माफी मागण्यास नकार दिला.
बोस कर्णधार अभिमन्यू ईश्वरन यांच्याशी बोलत असताना ही घटना घडली. यावेळी दिंडाने ड्रेसिंग रूममधून कोचला शिवीगाळ केली. दिंडाला संघातून वगळायचे नव्हते परंतु जेव्हा बंगालच्या क्रिकेट असोसिएशनने दिंडाला बोसची माफी मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.
यांनतर संघाने दिंडाला बाहेरचा रास्ता दाखवला. डिंडाने भारतीय संघासाठी 13 एकदिवसीय आणि 9 टी 20 सामने खेळले आहेत.