कोहलीला कोणाकडून प्रेरणा घ्यावी लागत नाही…!

अष्टपैलू क्रिकेटपटू मार्क स्टॉयनिस याने केला कोहलीचा गौरव

सिडनी – भारतीय कर्णधार आणि आक्रमक फलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेला विराट कोहली हा निसर्गत:च प्रतिभावान खेळाडू असल्याने त्याला कोणाकडून प्रेरणा घ्यावी लागत नाही; तर तोच अनेकांचे प्रेरणास्थान बनलेला असतो, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू मार्क स्टॉयनिस याने कोहलीचा गौरव केला आहे. 

आपल्या पहिल्या-वहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी कोहलीने पालकत्वाची रजा घेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून पहिल्या सामन्यानंतर मायदेशी परतण्याचे ठरवले आहे, यात वावगे काहीही नाही, असे म्हणत स्टॉयनिसने कोहलीची पाठराखण केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.