KKR vs SRH : आयपीएल 2024 च्या तिसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत केकेआरला फलंदाजीसाठी मैदानावर आमंत्रित केलं. केकेआरच्या डावाची सुरुवात खराब झाली. परंतु त्यानंतर सॉल्टने केलेल्या फिफ्टीच्या जोरावर आणि आंद्रे रसलच्या फटकेबाजीमुळे केकेआरला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.यामध्ये केकेआरची सुरुवात चांगली गडगडली होती. नरेन,अय्यर आणि श्रेयस झटपट बाद झाल्यानंतर नितीश राणा देखील केवळ नऊ रण बनवून तंबूत परतला. | KKR vs SRH
यानंतर फिलिप सॉल्टने संयमी खेळी करत दमदार फिफ्टी पूर्ण केली आणि केकेआरचा डाव सावरला. मात्र फिफ्टी पूर्ण करताच तो तंबूत परतला आणि केकेआरला सहावा धक्का बसला.मारकंडेला सॉल्टची वादळी खेळी रोखण्यात यश आलं. 15 ओव्हर्सनंतर केकेआरने 6 विकेट्स गमावून बोर्डावर 123 धावा लावल्या होत्या. | KKR vs SRH
रसल – रिंकूची दमदार फटकेबाजी
सॉल्ट आउट होताच मैदानात आलेल्या आंद्रे रसलने मारकांडेला एकाच ओव्हरमध्ये तीन सिक्स लगावत दमदार फटकेबाजी केली. रिंकू सिंगने देखील रसलला चांगली साथ देत फटकेबाजी केली. दोघांनी मिळून 24 बॉल्समध्ये 50 रान्सची भागीदारी पूर्ण केली. रसलने अवघ्या 20 बॉल्समध्ये आपली फिफ्टी पूर्ण करत टीमला मजबूत स्थितीत नेले. अखेरच्या ओव्हरमध्ये नटराजनने रिंकूला आउट करत ही जोडी फोडली.
End of Innings ‼️#KKR set a target of 209 courtesy Andre Russell and Rinku Singh 🎯#SRH chase starting 🔜
Follow the match ▶️https://t.co/xjNjyPa8V4 #TATAIPL | #KKRvSRH pic.twitter.com/jCqTTQU5aT
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2024
रसल रिंकूने केलेल्या फटकेबाजीमुळे केकेआरला शेवटच्या पाच ओव्हर्समध्ये 85 रन्स मिळाले. रसलने केलेल्या 64 (25) रन्सच्या जोरावर केकेआरने 20 ओव्हर्समध्ये सनरायझर्ससमोर 208 रन्सचा डोंगर उभा केला आहे. | KKR vs SRH