IPL 2024 ( KKR vs RCB Match 36) : आज, आयपीएल 2024 च्या 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आमने-सामने होते. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने पाचवा विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने थरारक अशा सामन्यात आरसीबीचा एका धावेने पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकांत 6 गडी गमावून 222 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीला शेवटच्या चेंडूवर तीन धावा करायच्या होत्या, पण संघाला एकच धाव करता आली आणि पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबी संघ सर्वबाद केवळ 221 धावा करू शकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या केकेआर संघाने 6 विकेट गमावत 222 धावा केल्या. या काळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. असा विक्रम जो आजपर्यंत कोणत्याही संघाच्या नावावर नव्हता.
आरसीबीच्या नावावर नोंदवला गेला ‘हा’ नकोसा विक्रम…
आरसीबीचे गोलंदाज यंदाच्या मोसमात पॉवरप्लेमध्ये खूप धावा खर्च करत आहेत. कोलकाता नाईट रायझर्सविरुद्ध रविवारी(21 एप्रिल) खेळल्या गेलेल्या सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये 75 धावा दिल्या. आयपीएल 2024 मध्ये ही चौथी वेळ आहे जेव्हा आरसीबीच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये 70 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या आहेत. त्याच वेळी, RCB संघ देखील IPL च्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याने एकाच मोसमात 4 वेळा पॉवरप्लेमध्ये 70 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत.
पॉवरप्लेमध्ये आरसीबीचे गोलंदाजांची खराब स्थिती…
या हंगामात, आरसीबीने पॉवरप्लेमध्ये 50 पेक्षा कमी धावा फक्त एकदाच दिल्या आहेत, तर 7 वेळा 50 पेक्षा जास्त धावा खर्च केल्या आहेत. या मोसमात कोलकाता नाईट रायझर्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पॉवरप्लेमध्ये 85 धावा खर्च केल्या होत्या. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पॉवरप्लेमध्ये 76 धावा दिल्या होत्या.
IPL 2024 : पॉवरप्लेमध्ये RCB गोलंदाजांची स्थिती
सीएसके विरुद्ध : 62/1
पंजाब किंग्स विरुद्ध : 40/1
केकेआर विरुद्ध : 85/0
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध : 54/1
राजस्थान रॉयल्स विरुद्ध : 54/1
मुंबई इंडियन्स विरुद्ध : 72/0
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध : 76/0
केकेआर विरुद्ध : 75/3
दरम्यान, फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली, बेंगळुरूने चालू मोसमात ( IPL 2024) आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 8 सामन्यांमध्ये फक्त 1 विजय नोंदवला आहे. आरसीबीचे सध्या 2 गुण आहेत आणि संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.