मुंबई – हिंदी सिनेमा सृष्टीतील हरफन मौला किशोर कुमार यांची जीवनगाथा आता रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. किशोर कुमार यांच्या परिवाराने किशोर कुमार यांचा बायोपिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
अलीकडेच किशोर कुमार यांच्या जयंतीच्या निमित्ताने किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर आणि पुत्र अमित कुमार यांनी या बायोपिकची कल्पना मांडली. अमित कुमार यांनीच वडील किशोर कुमार यांच्यावरील सिनेमा प्रोड्युस करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमाचे डायरेक्शनदेखील अमित कुमारच करणार आहेत.
किशोर कुमार यांच्यावरील बायोपिक बनवण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेक जणांनी केला होता. मात्र, काही कारणांमुळे हा सिनेमा बनवला जाऊ शकला नव्हता. यामध्ये शुजीत सरकार आणि अनुराग बासू यांचाही समावेश होता. मात्र माझ्या वडिलांचा बायोपिक मी स्वतःच बनवायचे ठरवले होते, असे अमित कुमार यांनी सांगितले.
या बायोपिकची स्क्रिप्ट लिहायला किमान एक वर्ष लागू शकते. त्यामुळे हा बायोपिक प्रत्यक्ष बनवला जायला बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये किशोर कुमार यांचा रोल कोण करणार या प्रश्नाचे उत्तर आताच दिले जाऊ शकणार नाही.