किसान सभा समितीच्या वतीने बुधवारी धरणे आंदोलन

मंचर- पुणे जिल्हा किसान सभा समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. 21) जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये शेकडो महिला-पुरुष सहभागी होणार आहेत, अशी माहिती ऍड. नाथा शिंगाडे यांनी दिली.

अदिवासी वनहक्‍क कायद्याची प्रामाणिक व प्रभावी अंमलबजावणी व्हावी, इनाम वर्ग 3ची जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करावी, रोजगार हमी कायद्यानुसार हक्काचा रोजगार मिळावा आयोजित करावा, पेसा कायद्यानुसार शासकीय योजनांचे लाभार्थी ग्रामसभेने निवडावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, सावरली (ता. आंबेगाव) गावचा अपूर्ण रस्ता त्वरित पूर्ण करावा, रेशनकार्डधारकांना रॉकेल मिळावे, आंबेगाव तालुक्‍यासाठी पूर्णवेळ तहसीलदाराची नियुक्त करावी आदी मागण्यांसाठी समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती अशोक पेकारी, सोमनाथ धारवाड, डॉ. मंगेश मांडवे, इम्रान इनामदार यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.