नारायणगाव- महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर भागामध्ये निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीमुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीवनावाश्यक औषधे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रिटेल केमिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य, अजिंक्यतारा नागरी पतसंस्था नारायणगाव, मृत्युंजय फाउंडेशन आणि अजिंक्य स्पोर्टस क्लब नारायणगाव यांच्यामार्फत सांगली केमिस्ट असोसिएशन यांचेकडे साडेपाच लाखांची औषधे आज (दि 20) पाठविण्यात आली.
सांगली, कोल्हापूर भागात पुरपरीस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचे गांभीर्य लक्ष घेऊन शिरूर लोकसभा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नियोजन करून तेथील स्थानिक आरोग्य अधिकारी, केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून साडेपाच लाखांची औषधे उपलब्ध करून या भागात पाठविण्याचे नियोजन केले.
मृत्युंजय फाउंडेशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र रजि. फार्मासिस्ट उपाध्यक्ष आशिष हांडे, रिटेल केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सचिन भालेकर, अजिंक्यतारा पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, उपाध्यक्ष पराग हांडे, सचिव अतल आहेर, संचालक विशाल तिवारी, राजेश कोल्हे, डॉ. हनुमंत भोसले, यज्ञेश औटी, शेखर शेटे, राजकुमार कोल्हे, गणेश कोल्हे, राजेंद्र विटे, तुषार डोके, संदेश कोल्हे, मयूर पाटे यांच्या विशेष प्रयत्नातून ही औषधे उपलब्ध करून पाठविण्यात आली.