कियारा आडवाणीने सुरू केले “इंदू’चे शुटिंग

“कबीर सिंह’च्या यशानंतर कियारा आडवाणीचे चांगले दिवस सुरू झाले आहेत. “कबीर सिंह’नंतर तिने अनेक प्रोजेक्‍ट स्वीकारले आहेत, आता ती “इंदू की जवानी’मध्ये काम करणार आहे. या सिनेमाचे शुटिंग सुरू झाले आहे. याबाबत कियाराने इन्स्टाग्रामवर लिहीलेल्या पोस्टमधून माहीती दिली आहे.

“इंदू की जवानी’मध्ये कियारा गाझियाबादमध्ये राहणाऱ्या इंदू गुप्ता नावाच्या एका बिनधास्त मुलीचा रोल करते आहे. याशिवाय ती “गुड न्यूज’मध्येही काम करते आहे. “गुड न्यूज’मध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार, करीना कपूर-खान आणि दलजीत दोसांज असणार आहेत.

याशिवाय अक्षय कुमारच्या “लक्ष्मी बम’मध्ये कियारा लीड रोल करते आहे. कियाराला याबरोबर आण्खीन काही सिनेमांचे प्रस्ताव मिळाले आहेत. काही सिनेमांच्या स्क्रीप्टवर ती काम करते आहे. स्क्रीप्ट निश्‍चित होऊन मगच सिनेमात काम करायचे की नाही, याबाबतचा निर्णय ती घेणार आहे.

मात्र सध्या हातात असलेल्या सिनेमांच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष करून अन्य कोणत्याही सिनेमाचे नियोजन करायचे नाही, असे तिने ठरवले आहे.

याशिवाय काही सिनेमांच्या करारांवर तिने स्वाक्षऱ्या केल्या असल्या तरी निर्मात्यांकडून औपचारिक घोषणा होईपर्यंत याबाबत काहीही बोलायचे नाही, अशी तिला सूचना आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.