दीपिका पदुकोणची मानसिक आजारांबाबत व्याख्यानमाला

दीपिका पदुकोण काही वर्षांपूर्वी मानसिक आजाराने ग्रस्त होती, हे सगळ्यांना माहित आहे. याबाबत दीपिकाने एक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेला दीपिकाने रविवारपासून सुरुवात केली. तिने चार वर्षांपूर्वी “लीव्ह लव्ह लाफ फौंडेशन’ सुरू केले आणि त्या माध्यमातून ही व्याख्यानमाला आयोजित केली गेली आहे.

संवाद प्रक्रिया अव्याहत सुरू ठेवण्यासाठी व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रदर्शने आणि मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करणे हे या फौंडेशनचे काम आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणूनच ही व्याख्यानमाला दीपिकाने आयोजित केली आहे. आपल्यातील घुसमट घालवण्यासाठी सातत्याने व्यक्‍त होणे गरजेचे आहे. म्हणूनच सातत्यपूर्ण संवादासाठीचा हा प्रयत्न असल्याचे दीपिकाने सांगितले.

या व्याख्यानमालेसाठी जगभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना निमंत्रित केले गेले आहे. मानसिक आरोग्याबाबत उत्कट भावना असलेल्या आणि या क्षेत्रातील प्रवास, अनुभवांबाबत बोलू इच्छिणारी ही मंडळी आहेत. यातील पहिले व्याख्यान पुलित्झर ऍवॉर्ड आणि पद्‌मश्री मिळालेले व्याख्याते सिद्धार्थ मुखर्जी यांचे होते.

Leave A Reply

Your email address will not be published.