झोया अख्तरने तिच्या आगामी ‘द आर्चीज’ चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि टीझर रिलीज केले आहे. झोया अख्तरच्या या चित्रपटात शाहरुख खानची लाडकी लेक सुहाना खान, श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी लेक खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारसाठी सज्ज झाले आहे.
या तीन स्टार किड्ससोबत मिहिर आहुजा, डॉट, युवराज मेंडा आणि वेदांग रैना मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा चित्रपटातील पोस्टरमध्ये वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहेत. हा चित्रपट द आर्चीज कॉमिकचे रूपांतर आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत या पोस्टर आणि टीझरवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.
‘द आर्चिज’च्या टीझरमध्ये काय आहे?
व्हिडिओमध्ये आर्ची आणि त्याच्या गँगमधील मैत्री आणि बंध दिसत आहेत. सर्वच स्टार्ससोबत मस्ती करताना दिसत आहेत. हसत, हसत, उड्या मारत नाचत, कुणी सायकलवरून फिरत, सगळे एकत्र पिकनिक करताना दिसतात. चित्रपटात अगस्त्य आर्चीची भूमिका साकारत आहे, तर खुशी बेट्टी आणि सुहाना वर्निकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करताना झोया अख्तरने सांगितले की, हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट प्रसिद्ध कॉमिक बुक ‘आर्चीज’ वर आधारित आहे, जे पाहून तुम्ही गेलेल्या दिवसांच्या आठवणींमध्ये हरवून जाल. पुढील वर्षी 2023 मध्ये हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाची पोस्ट शेअर करतान अगस्त्य नंदा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुहाना खानने इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला