तरुणाचे अपहरण करून खून

हॉटेलसमोर लघुशंका केल्याने वाद : गळा चिरून केली हत्या
पिंपरी – हॉटेलसमोर लघुशंका नको करु, असे सांगितल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाचे अपहरण करुन गळा चिरुन खून करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार पिंपरीमध्ये घडला. ही घटना मंगळवारी (दि.23) पहाटे साडेतीन ते पाचच्या दरम्यान घडली.

पिंपरीतील कुणाल हॉटेलमधून अपहरण करुन आणलेल्या तरुणाचा मृतदेह पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरून गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आढळून आला. हितेश गोवर्धनदास मुलचंदानी (वय 24, रा. राजा गल्ली, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अमिन फिरोज खान (रा. मोमीनपुरा, गंजपेठ, पुणे), शाहबाज सिराज कुरेशी (रा.कासारवाडी), आरबाज शेख (रा.खडकी), लिंगा उर्फ अक्षय संजय भोसले (रा.सांगवी) व लंगडा (रा. सांगवी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित किशोर सुखेजा (वय 26, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी मंगळवारी पहाटे आरोपी पिंपरीतील कुणाल बार ऍण्ड रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये बीअर घेण्यासाठी आले होते. आरोपींपैकी अमीन खान हा हॉटेलच्या गेटजवळ लघुशंका करू लागला. हॉटेलसमोर लघुशंका करु नकोस, असे सांगितल्याने आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. व त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या साहिल ललवानी यांना शिवीगाळ केली, तर कैलास पाटील याच्या डोक्‍यात बीयरची बाटली फोडून जखमी केले.

तसेच फिर्यादी यांचा चुलत भाऊ लखन सुखेजा आणि त्याचा मित्र हितेश मुलचंदानी यांनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी जबरदस्तीने हितेशला आपल्या मोटारीत बसवून त्याचे अपहरण केले व मोटारीतून पिंपरी चिंचवड महापालिका इमारतीच्या पाठीमागील बाजूस गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणले. आरोपींनी हितेशचा धारदार शस्त्राने वार करुन गळा चिरुन महापालिकेच्या मागील बाजूस गांधीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकून दिले. पहाटे पाचच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाला मृतदेह दिसला असता त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)