येडियुरप्पाच होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

आज भाजप आमदारांची महत्वाची बैठक

बंगळुरूः कर्नाटकमध्ये महिन्याभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. कॉंग्रेस, जेडीएसच्या 15 आमदारांनी राजीनामे दिल्याने कर्नाटक सरकार अडचणीत आले होते. त्यानंतर कुमारस्वामी सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला, त्यात 99 आमदारांनी सरकारच्या बाजूने, तर 105 आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे साहजिकच कुमारस्वामी सरकार कोसळले. आता भाजपानेही कर्नाटकमध्ये सरकार बनवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचदरम्यान मध्यरात्री भाजपाच्या आमदारांची बैठक येडियुरप्पांच्या अध्यक्षतेखाली एका हॉटेलमध्ये झाली. आज पुन्हा 11 वाजता ही बैठक होणार आहे. येडियुरप्पांनी भाजपाध्यक्ष अमित शाहांना पत्र लिहून समर्थन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत.

तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते सदानंद गौडा यांनी येडियुरप्पाच कर्नाटकत भाजपाचे मुख्यमंत्री असतील, असे स्पष्ट केले आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार म्हणाले, आमच्याकडे 105 आमदारांचे संख्याबळ आहे. सभागृहात बहुमत असल्याने आम्ही सरकार बनवणार आहोत. तसेच कॉंग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांचे राजीनामे अद्याप कर्नाटकातल्या विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारलेले नाहीत. आता ते भाजपाबरोबर जातात की नाही, येत्या काळात समजणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)