पुणे – खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धेमध्ये पुण्याच्या सुमित तपकीर याने स्पीड आइस स्केटिंग या क्रीडा प्रकारात एक सुवर्ण व एक रजतपदक पटकावले.
जम्मू-काश्मीरमधील गुलमर्ग येथे गेल्या 26 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. खेलो इंडिया राष्ट्रीय हिवाळी स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील दोन खेळाडूंची निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या दोन खेळाडू पैकी सुमित तापकीर याचा सामावेश होता.
पुण्यातील बाणेर येथे भारती विद्यापीठात प्रशिक्षक संजोग तापकीर यांच्या मार्गदर्शन खाली सुमीत प्रशिक्षण घेतो. खेलो इंडिया स्पर्धेत दोन पदके पटकावली तेव्हा मेहनतीचे चीज झाले, अशा शब्दात सुमितने आपल्या भावना व्यक्त केल्या. सुमितने यापूर्वीही राष्ट्रीय आइस स्केटिंग प्रकारात पदके पटकावली आहेत. आशियाई स्पर्धेत रिलेमध्येही त्याने रजतपदक मिळवले आहे.