भारत बायोटेकची लस आता नाकाद्वारे

नवी दिल्ली – हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपनीने करोनाच्या नाकातून घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी सुरु केली आहे. या प्रॉडक्‍टचं नाव बीबीव्ही 154 असे आहे. हे एक नाकातून दिले जाणारे व्हॅक्‍सिन आहे. फेब्रुवारीमध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने भारत बायोटेकला व्हॅक्‍सिनच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती.

या व्हॅक्‍सिनची चाचणी सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी 10 लोकांना निवडण्यात आलं आहे. आतापर्यंत 2 लोकांना ही लस देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्या दोघांचीही प्रकृती चांगली आहे. भारत बायोटेकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.

ही नाकावाटे घेतल्या जाणाऱ्या लसीची चाचणी यशस्वी ठरल्यास देशातील लसीकरण मोहीम अजून सोपी आणि वेगवान होईल असे मानले जाते आहे. भारत बायोटेकने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये वॉशिंग्टन विद्यापीठाशी करार केला आहे. या नव्या नेझल व्हॅक्‍सिनचा केवळ एकच डोस घ्यावा लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.