खालापूर,(वार्ताहर) – खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.खोपोलीतील डीपी रोड ग्राउंडवर या स्पर्धा येत्या १९ फेब्रुवारी होमार आहेत. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम उपस्थित होते.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी संतोष जंगम होते. प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर, माजी नगरसेवक मोहन औसरमल, शेकापक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील, माजी गटनेते मंगेश दळवी, उद्योजक विक्रम साबळे, शिंदे सेनेचे कर्जत – खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, शहरप्रमुख संदीप पाटील, संपर्क प्रमुख हरेश काळे, के.टी.एस.पी.मंडळाचे उपाध्यक्ष अबूशेठ जळगांवकर, सदस्य कैलास गायकवाड, दिनेश गुरव, माजी नगरसेवक अमोल जाधव, समीर मसुरकर, रविंद्र रोकडे, विशाल गायकवाड, प्रिया जाधव, रूपाली जाधव, दिनेश थोरवे आदी उपस्थित होते.
खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून यशवंत साबळे यांनी क्रिकेटच्या सामने भरवत कर्जत खालापूरातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत खऱ्या अर्थाने क्रिकेटर घडवण्याचे काम खोपोली क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकारी करत असल्याचे मत आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून मैदानावर यष्टीपूजन करण्यात आले.
आमदार महेंद्र थोरवे फलदांजी केली. तर गोलंदाजी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी करीत सामन्यांचे उद्घाटन केले. विजेत्या संघाला एक लाख 25 हजार, उपविजेत्या संघाला 75 हजार व तिसऱ्या क्रमांकावरील संघाला 25 हजार रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वोत्तम फलंदाज, गोलंदाज व क्षेत्ररक्षकासाठी बक्षिसे आहेत. खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे, सचिव अविनाश तावडे, खजिनदार शंकर दळवी यांनी संयोजन केले.