गराडे, (वार्ताहर) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी मैदानावर रविवारी (दि. 10) सायंकाळी 6 वाजता खेळ खेळू पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख ममता शिवतारे-लांडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बाल गायिका मळेगावकर प्रस्तुत सन्मान श्री शक्तीचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात खेळ खेळू पैठणीचा हा रंगतदार कार्यक्रम होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात रंजक असलेल्या या कार्यक्रमातील गप्पागोष्टी, रंजक खेळ, हिंदी मराठी गाणी यातून महिलांच्या आनंदाला यावेळी उधाण येणार आहे. महिलांना निःशुल्कपणे या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
तसेच सहभाग घेणार्या प्रत्येक महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. यासह लकी ड्रॉच्या माध्यमातून निवडल्या जाणार्या 105 महिलांना मानाच्या पैठण्या मिळणार आहेत. या खेळात सहभागी होण्यासाठी प्रवीण लोळे ( 9698918345) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ममता शिवतारे-लांडे यांनी केले आहे.
विजेत्यांवर पैठणीसह बक्षिसांची लयलुट
बक्षिसे प्रथम : अॅक्टिव्हा, द्वितीय : द्वितीय 43 इंच एलइडी टीव्ही, तृतीय : फ्रीज, चतुर्थ : वॉशिंग मशीन, पाचवे : पिठाची गिरणी, सहावे : वॉटर प्युरीफायर, सातवे : कुलर, आठवे : ज्यूस मिक्सर, नववे : टेबल फॅन, दहावे : इस्त्री, अकरावे : डिनर सेट