पारनेर, (प्रतिनिधी) – आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात पारनेर तालुका आरपीआय (ए ) यांची पारनेर शहरातील तक्षशीला बुद्धविहार येथे राजकीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. पुणे जिल्हाध्यक्ष सचिन खरात, कर्जत तालुकाध्यक्ष विकास कांबळे, पारनेर तालुकाध्यक्ष किरण सोनवणे यांचे नियोजनात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र संघटक कैलास जोगदंड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी समाजातील विविध घटकांना शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांना योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पारनेर तालुक्यातील सर्व बहुजन समाजातील युवकांना आरपीआयमध्ये सामावून घेऊन पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.
गावागावांत आरपीआयची ग्रामीण शाखा निर्माण करावी. महिला व युवक यांचा विशेषत सहभाग वाढवावा. महिला बच गट यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय स्तराव शिबिरे आयोजित करावी. या वेळी पारनेर, हंगा, सुपा या गावातील युवा कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी पक्षात प्रवेश दिला. यावेळी महिला तालुकाध्यक्षपदी माही सूर्यवंशी तर तालुका संघटकपदी प्रदिप कसबे, तालुका कार्यध्यक्षपदी सचिन अल्हाट यांची निवड करण्यात आली.
बैठक यशस्वी करण्यासाठी ॲड. मोनिका सोनवणे, मृणाली सूर्यवंशी, प्रतीक्षा मोरे, कांचन मोरे, वर्षा सूर्यवंशी, बाळासाहेब कांबळे, मच्छिंद्र साळवे, विकास पवार, स्वप्नील आल्हाट, योगेश कांबळे, स्मितम राक्षे, सिध्दार्थ सातपुते, आयर्न गायकवाड, सम्राट पवार आदी प्रयत्नशिल होते.