2005 मध्ये आलेल्या “बंटी और बबली’ने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली होती. अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी यांच्या केमिस्ट्रीने आणि त्यांनी सगळ्यांना उल्लू बनवण्यासाठी वापरलेल्या फंड्याने पब्लिक येकदम खूष झालं होतं.
या चित्रपट बंटी और बबली च्या भूमिकेतील अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जी भूमिका सिनेप्रेक्षकाना वेगळीच भुरळ लावली होती. या चित्रपटात आता बंटी और बबली च्या भूमिकेत अभिषेकच्या जागी सैफ अली खान आणि राणी मुखर्जी दिसणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या चित्रपटात बिग बी आणि “कजरा रे..’ म्हणणारी ऐश्वर्या यामुळे या सिनेमाची चलती गाडी एकदम बुंगाट सुटली होती. आता याच “बंटी और बबली’ला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
View this post on Instagram
शाद अली यांच्या डायरेक्शनखाली या सिक्वेलचे शुटिंग सुरू होणार आहे. वर्क फ्रंटच्या बाबतीत बोलायचे तर “बंटी और बबली’मधील केवळ अमिताभ बच्चन यांच्याच नावाने दरवर्षी 1-2 सिनेमे झळकत आहेत. अभिषेक, ऐश्वर्या आणि राणी मुखर्जी यांनी तर गेल्या 10 वर्षांपासून जणू काही करिअरमध्ये ब्रेक घेतला आहे. अलिकडच्या काळात त्यांचे कोणतेच सिनेमे रिलीज झालेले नाहीत. “बंटी ऑर बबली 2’मध्ये “कजरारे कजरारे…’ म्हणायला ऐश्वर्या आहे की नाही हे नाही समजले.