डबलीन (आयर्लंड) : सध्या आयर्लंड क्रिकेट मंडळ आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे आयर्लंड क्रिकेट मंडळाने २०२० च्या भविष्यातील दौ-याच्या वेळापत्रकात बदल केला आहे.
📡 NEWS: Cricket Ireland has today announced changes to the 2020 FTP:https://t.co/fFhaPGRFGT#BackingGreen ☘️🏏 pic.twitter.com/NqJdaal0F1
— Cricket Ireland (@cricketireland) December 16, 2019
आयर्लंड क्रिकेट मंडळाने अफगाणिस्तान विरूध्द ५ सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका रद्द केली. तसेच बांगलादेशविरूध्द कसोटी सामन्याऐवजी टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे.