रायगड – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहेइर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ २ पथके पोहचली आहेत. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. सुमारे १७ घरावर दरड कोसळली आहे. दोन भागात. आणखी दोन पथके पोहोचतील. गावात जाण्यासाठी पायवाट असल्याने मदत साहित्य पोहचण्यास उशीर होत आहे. आणखी दोन पथके पोहचली आहे.
दरम्यान, या घटनास्थळी अनेक स्थानिकांनी आपला जीव वाचवला आहे. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. येथे १० ते २० फिट ठिगारा असल्याचे ndrf कडून सांगण्यात येत आहे. अशात नातेवाईकांकडून टाहो फोडण्यात येत आहे. आम्हाला वरती जाऊ द्या. आमची माणसं आम्हाला शोधू द्या. आम्ही आमच्या माणसांना शोधून काढू.. काही लोक वरती गेले आहे. आमच्या लोकांना वाचवा. अशी विनंती नातेवाइकांकडून केली जात आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.