MUMBAI : सन 2018 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरस्टार यशचा “केजीएफ’ हा चित्रपट त्या वर्षामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला होता. चित्रपटातील त्याच्या रॉकी या भूमिकेमुळे यशचे सर्वत्र खूपच कौतुक झाले. तसेच त्याची स्टाईलही युवावर्गात ट्रेंड झाली होती. यानंतर या चित्रपटाच्या सीक्वलची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने चित्रीकरणासही परवानगी देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात यशने कठोर मेहनत घेतली असून सेटवर वापसी करण्यासाठी तो खूप उत्साहित होता. आता त्याने पुन्हा काम सुरू केले आहे. याचा एक फोटो यशने आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केला होता.
View this post on Instagram
तर पुन्हा एकदा यशने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर फॅमिलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेता यश आपल्या फॅमिलीसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. समुद्र किनारी त्याचे धमालमस्ती करतानाचे फोटो चाहत्यांना चांगलीच भोळलं घालत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, “केजीएफ-2′ हा 2020 या वर्षातील सर्वाधिक बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक चित्रपट आहे. या चित्रपटात यश पुन्हा एकदा रॉकी भाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच संजय दत्त हा अधिराच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.