मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधांत दिल्लीच्या सीमेवर मागच्या जवळपास २ महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, आता शेतकऱयांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
येत्या 25 जानेवारीला दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्सासाठी आझाद मैदानात होत असलेल्या आंदोलनात सहभागी होणार आहे. प्रजासत्ताक दिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्यावरून देशावासियांना संबोधित करतात. त्याच्याच ठिक दिवसाअगोदर शरद पवार शेतकरी आंदोलनात सहभागी होणार आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येत्या 23, 24, 25 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवार 25 जानेवारीला आझाद मैदानात सहभागी होणार आहे. अशी माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याच्या पाठिंशी असून, या आंदोलनात मुख्यमत्र्यासह तिन्ही पक्षातील नेते सहभागी होणार आहेत.