कोची – केरळमधील कोचिन कार्निवल मध्ये गव्हर्नरम थोपियम (राज्यपालांची टोपी) नावाचे एक नाटक सादर केले जाणार होते, परंतु या नावाच्या नाटकावर तेथील भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप घेऊन एका उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. व त्यांनी या नाटकाचे नाव बदलण्यास भाग पाडले.
सध्या केरळात राज्यपालांनी तेथील डाव्या आघाडी सरकारच्या विरोधात अडवणुकीची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यपालांना लक्ष्य करण्यासाठीच हे नाटक सादर केले जाणार असल्याचा दावा करून भाजपने त्याला विरोध दर्शवला.
घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा हाअवमान असल्याचे भाजपच्या लोकांनी आपल्यातक्रारीत म्हटले होते. त्यानुसार दंडाधिकाऱ्यांनी या नाटकाच्या नावातील राज्यपाल हा शब्द काढून टाकण्याची सुचना केली आहे. कोचीन कार्निवल हा एक अत्यंत उत्साही वार्षिक उत्सव, या बंदर शहरात दर वर्षी आयोजित केला जातो.
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी घटनात्मक पदे, केंद्र आणि राज्य सरकारे किंवा ड्रेसिंग, धर्म किंवा राजकारणाशी संबंधित कोणत्याही प्रकारावर टिकटिप्पणी करण्यास मनाई केली आहे.