कोची – अंमलबजावणी संचालनालयाने केरळचे ज्येष्ठ सीपीआय (एम) नेते थॉमस आयझॅक यांना त्यांच्या मागील अर्थमंत्री असतानाच्या काळातील केआयआयएफबीच्या आर्थिक व्यवहारातील चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. ७१ वर्षीय आयझॅक यांना १२ जानेवारी रोजी कोची येथील ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. या आधी ईडीने त्यांना बजावलेले समन्स मागे घेतले होते. त्यामुळे त्यावेळी दाखल करण्यात आलेले खटले मागे घेतले गेले होते.
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, आम्हाला या प्रकरणात हायकोर्टाने तपास सुरू ठेवण्यास अनुमती दिली होती. त्यानुसार आम्ही या दोन हजार कोटी हजार रूपयांच्या प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे.
केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड पायाभूत सुविधा प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी राज्य सरकारची एजन्सी आहे. या बोर्डासाठी ५० हजार कोटी रुपयांची उभारणी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून २०१९ मध्ये मसाला बाँड इश्यूद्वारे २१५० कोटी रुपये उभारले होते. त्यात ईडीला फेमा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय आहे आणि म्हणून त्यांनी चौकशी सुरू करण्यात आली आहे.