बारामती – पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, वरिष्ठ वैज्ञानिक कार्यालय भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात अटल भूजल वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सचिन गाडेकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर धोटे, सहाय्यक भूवैज्ञानिक सुजाता सावळे यांच्या शुभहस्ते झाले.
वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धेतील प्रथम क्रमांक तृप्ती शिवाजी जाधव, फडतरे गौरी यांना विभागून देण्यात आला. द्वितीय क्रमांक श्रीखंडे तेजस्विनी नितीन, तृतीय क्रमांक जाधव आकाश, उत्तेजनार्थ जाधव स्वाती यांनी पटकावला. तर निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांक तांबोळी कौसर असिफ, द्वितीय मुळीक आरती शिवराज, तृतीय माने योगिता विजयकुमार, उत्तेजनार्थ खोमणे प्रदीपा भरत, तृप्ती शिवाजी जाधव यांनी मिळवला.
पारितोषिक वितरण समारंभात प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन रा. से. यो. चे जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले, कार्यक्रम अधिकारी डॉ.चंद्रकांत कांबळे, डॉ. निरंजन शहा व स्पर्धा समन्वयक वैभव भापकर वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षक सोमनाथ कदम, पृथ्वीराज लाड तर निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून अमोल पिसाळ व गजानन लोणकर यांनी काम पाहिले.
अनेकांत ऐज्युकेशन सोसाटीचे अध्यक्ष जवाहर शहा (वाघोलीकर), सचिव मिलींदभाई शहा (वाघोलीकर), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे, डॉ.सचिन गाडेकर, डॉ योगिनी मुळे, रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी स्पर्धेचे कौतुक करून विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वरी लोखंडे व गोपीचंद कुंभार यांनी केलं तर आभार डॉ. विलास कर्डिले यांनी मानले.