ऑनलाईन ट्रोलींग आणि ऑनलाईन धमकी देण्याचा प्रकार सध्याच्या स्थितीत काही नवा नाही. रोज अनेक लोक ट्रोलिंगचा सामना करतात आता याच प्रकरणात केरळच्या एका दाम्पत्याची भर पडली आहे. सध्या सगळीकडेच कोरोनाचं वातावरण आहे त्यामुळे अनेकांचे विवाह खोळंबले होतो. मात्र काहींच्या उपस्थितीत अनेकांनी विवाहसोहळे आटपले. याच दरम्यान विवाह सोहळ्यासाठी अनेकांच्या अनेक ईच्छा असतात त्या पुर्ण करु न शकल्याने अनेकजण नाराज झाले. तर काहींनी त्यावर तोडगा देखील काढला.
सध्या प्री-वेडींग फोटोशुटसाठी अनेक तरुण-तरुणी काही नव्या संकल्पना करण्याच्या विचारात असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या फोटोशुटवर पाणी फेरल्या गेलं. मात्र केरळच्या दाम्पत्यांनी तोडगा काढत प्री-वेडींग नाहीतर पोस्ट वेडींगची नवी संकल्पना उदयास आणली. त्यानुसार त्यांनी फोटोशुटसुद्धा केलं. मात्र त्यांचं पोस्ट वेडींग फोटोशुटला आता ऑनलाईन धमक्यांचा आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हे फोटोशुट सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
कोरोनाचं सावट कमी होण्याचा अंदाज येताच ऋषी कार्तीकेयन आणि लक्ष्मी विवाहबंधनात अडकले. पोस्ट वेडिंग फोटोशुटची कल्पना सुचल्यानंतर त्यांनी फोटोग्राफर मित्राला गाढलं. केरळच्या इडुक्कीच्या चहाच्या बागेत त्यांनी फोटोशुट केलं.
ऋषी आणि लक्ष्मीचे फोटो त्यांच्यातील गोड, विश्वासू आणि बिनधास्त नातं दर्शवणारे होते. त्यांच्यातील प्रेमाची वेगऴी व्याख्या दर्शवणारे होते. ज्यावेळी फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आणि लगेचच ट्रोलींगला सुरुवात झाली. त्या फोटोत दोघेदी पांढऱ्या शुभ्र रंगाची चादर गुंडाळून धावतानाचे दृष्य आहे. चहाच्या हिरव्या मळ्यात हे फोटो प्रचंड सुंदर टिपले आहेत. मात्र काही संकुचित विचार असणाऱ्यांनी या फोटोचा चुकीचा अर्थ काढला.
द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार, अनेकांनी दाम्पत्याचे फोटो अश्लील आणि अनुचित असल्याचा आरोप करत फोटोवर टीका केली. लक्ष्मी ही अश्लिलतेला वाव देत आहे, असंही म्हणण्यात आलं. “कमेंट्स करुन अनेकांनी माझ्या आबरुचे धिंदोडे उडवले. मला लाजवण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर माझ्या कुटुंबीयांना भयंकर घाणेरडे प्रश्न सुद्धा विचारण्यात आले. तुम्ही खाली कपडे घातले आहेत का? या थराचे प्रश्न आम्हाला विचारण्यात आले. यावरुन मित्रपरिवाराने आणि नातेवाईकांनी आम्हाला फोटो डिलीट करण्याचा सल्ला देखील दिला”, असं लक्ष्नीने टीएनएमशी बोलताना सांगितले. मात्र फोटो डिलीट करणार नाही या निर्णयावर हे दाम्पत्य ठाम आहे. फोटोशूटची कल्पना वेडिंग स्टोरीज फोटोग्राफी करणारे फोटोग्राफर अखिल कार्तिकेयन यांची होती. मला ते नेहमीचं फोटोशुट नको होतं. लग्नापुर्वी साडी किंवा सुबक वेशात मंदिराजवळ टिपलेले फोटो आम्ही लग्नाअगोदर काढले असते. पण लग्नानंतरच्या आमच्या नात्यातील विश्वास, बिनधास्तपणा या फोटोतून सर्वांपुढे मांडण्याचा आमचा प्रामाणिक विचार नव्हता, असं ऋषी यांनी सांगितलं आहे. मी अनेकदा ऑफशोल्डर टॉप घातले. फॅशननुसार थोडे तोकडे कपडेसुद्धा घातले. मात्र त्या फोटोवर मला कधीच अशा प्रकारच्या कमेंट्स आल्या नाहीत. हल्ली सगळ्याच मुली फॅशननुसार वागतात, असं लक्ष्मीने मागील फोटोंबाबत सांगितलं. काही संकुचित विचारांच्य लोकांमुळे या दाम्पत्याला ट्रोलींगचा सामना करावा लागतो आहे. त्यांच्या मानसिकतेवरसुद्धा याचा परिणाम झाला आहे. केरळमधील फोटोशुट व्हायरल झाल्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील वर्षी डिसेंबरमध्ये एका जोडप्याने नागरिकताविरोधी (दुरुस्ती) कायदा आणि एनआरसीच्या निषेधासाठी फलक लावून निषेध व्यक्त केला होता तिरुअनंतपुरममधील जीएल अरुण गोपी आणि आशा शेखर यांनी लग्नाच्या प्री-वेडिंग फोटोशूटवर “नो सीएए” आणि “एनआरसी नाही” अशा फलकांसह फोटो लावला होता.