बर्नाला – आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबातील प्रचार दौऱ्याच्यावेळी एका माजी दहशतवाद्याच्या घरात मुक्काम केल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या प्रकरणावरून त्यांनी केजरीवालांवर टीका करीत त्यांचा निषेधही केला आहे.
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, कॉंग्रेस नेता कधीही माजी अतिरेक्याच्या घरी राहणार नाही.केजरीवाल यांनी पंजाबच्या दौऱ्यात मोगा येथे अतिरेक्याच्या घरी एक रात्र काढल्याचा दावा करणाऱ्या बातम्या काहीं वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या वृत्ताचा संदर्भ देत, बर्नाला येथे एका जाहीर सभेत राहुल गांधी यांनी केजरीवालांवर ही टीका केली.
झाडुवाला नेता दहशतवाद्याच्या घरात मुक्काम करतो ही बाब लाजीरवाणी आहे. अशा नेत्यांच्या हातात पंजाबची सत्ता देणे हितावह नाही. या राज्याला स्थीर सरकार देण्याची गरज असून कॉंग्रेस पक्षच पंजाबात स्थीर सरकार देऊ शकतो असे ते म्हणाले.