नवी दिल्ली – केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने चालू आर्थिक वर्षात 14 फेब्रुवारीपर्यंत सुमारे दोन कोटी करदात्यांना 1 लाख 71 हजार कोटी रुपयांचा आयकर परतावा जारी केला आहे, असे आयकर विभागाकडून बुधवारी सांगण्यात आले.
एप्रिल 2021 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत 1.97 कोटींहून अधिक करदात्यांना 1,71,555 कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे असे आयकर विभागाच्या ट्विटर संदेशात नमूद करण्यात आले आहे.
यात कॉर्पोरेट क्षेत्रातील परतावा 1 लाख 8 हजार 322 कोटींचा आहे. आयकर परतावा संबंधित खातेदारांना त्वरित जमा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टीमचा वापर केला जात असल्याने ही रक्कम संबंधितांच्या खात्यावर विनाविलंब पोहोचत असते.