सीएट टायर्स, मरॉन बॅटरी पीट स्टॉप दुकानाचे दिमाखात शुभारंभ
मेदनकरवाडीत आमदार मोहिते पाटलांचा कानमंत्र
चाकण : नवीन टायरची विक्री करताना त्यासोबत आपण अलाइनमेंट, बॅलन्सिंग, हवा चेकअप व बॅटरी असा पूरक व्यवसाय सुरू केल्याने ग्राहकांना एका ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे. चाकण औद्योगिक शहरात व्यवसाय वाढीला वाव आहे. व्यवसाय करताना उधारीत विक्री करू नका, ग्राहकास वाजवी किमतीत व उत्तम दर्जाच्या चांगल्या मालाची विक्री करा, नफा कमी राहिला तरी चालेल; परंतु चलन फिरते ठेवा आणि ग्राहकांना सेवा चांगली देण्याचा कानमंत्र आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला.
नारायणगाव येथील बांगा टायर्स आणि बॅटरीजचे मालक कंवरजितसिंग बांगा व दिलदीप बांगा यांनी मेदनकरवाडी (चाकण ता.खेड) येथे नव्याने सुरू केलेल्या सीएट टायर्स आणि मरॉन बॅटरी पीट स्टॉप दुकानाचा शुभारंभ शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते दिमाखात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राजगुरुनगर बॅंकेचे नवनिर्वाचित सदस्य व माजी अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, सदस्य किरण मांजरे, डॉ. अमोल बेनके, मेदनकरवाडीचे उपसरपंच संभाजी मेदनकर, माजी उपसरपंच मेदनकर, शामराव देशमुख, अनिल चोरडिया, सिएट टायर्स कंपनीचे झोनल मॅनेजर माणिक सिंग, रिजनल मॅनेजर नेहा सूर्या, टेरिटरी लीडर मोशीन शेख, रिजनल सर्व्हिस मॅनेजर मुर्तुजा सैफि व मान्यवर उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, बांगा परिवाराने आजपर्यंत टायर विक्री संबंधित व्यवसाय केला आहे. त्यातील बारकावे त्यांना माहित आहे. व्यवसाय करताना योग्य किंमत व पारदर्शी काम असल्याने ग्राहकांचा विश्वास प्राप्त केला आहे. कंवरजितसिंग बांगा आणि दिलदीप बांगा यांनी चाकण येथे नव्याने व्यवसाय सुरू केल्याचा मनस्वी आनंद होत आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील हे निश्चितपणे आपणास सहकार्य करतील हा विश्वास माझ्या मनात असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी तर मंगेश रत्नाकर यांनी आभार मानले.
आमचे स्नेही बांगा टायर्स आणि बॅटरीचे मालक कंवरजीत बांगा व दिलदीप बांगा यांच्या मेदनकरवाडी (चाकण) येथील सीएट टायर्स आणि मरॉन बॅटरी पीट स्टॉप दुकानास मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. बांगा परिवार आमच्या घरातील असून त्यांनी टायर विक्रीच्या व्यवसायात ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. म्हणूनच त्यांच्या चौथ्या दुकानाचे शुभारंभ करताना मला अभिमान आहे.
– डॉ. अमोल कोल्हे, खासदार