बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने शिक्षण अधिकारवर भर दिला आहे. इंस्टाग्रामवरील व्हिडिओत कतरिनाने शिक्षण अधिकारासाठी सर्वांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. यासाठी सर्वांनी योगदान देवून वंचित घरातील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हातभार लावावा, असे तिने सांगितले आहे.
View this post on Instagram
कतरिनाने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपणा सर्वांना सांगताना मला अभिमानस्पद वाटते की, माझ्या आईच्या चॅरिटीमार्फत शाळा सुरू करण्यात आली आहे. 2015 पासून मदुराई येथे माउंटन व्ह्यू स्कूलच्या माध्यमातून विशेषाधिकारित मुलांना इंग्रजी-माध्यम शिक्षण देण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या येथे दोनशे विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण देण्यात येत आहे. पुढील काळात येथील कक्षा वाढविण्याची आवश्यकता आहे.
View this post on Instagram
यासाठी सर्वांनी आपापल्या परीने मदत करावी, असे आवाहन केले आहे. कतरिना म्हणते, “आपण आपले काम करत राहिले पाहिजे जेणेकरून अधिकाधिक मुले त्यांची स्वप्न पूर्ण करु शकतील. दरम्यान, तमिळनाडूमधील मदुरई येथील एका शाळेच्या मदतीसाठी कतरिनाने पुढाकार घेतला आहे.