कतरिनाही स्वतःचे प्रॉडक्‍शन हाऊस काढणार

कतरिना सध्या “भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. आत भविष्यात प्रोड्युसर होण्याच्या दिशेने हालचाली करायच्या, असे तिने ठरवले आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत स्वतःचे प्रॉडक्‍शन हाऊस सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे तिने सांगितले. एखाद्या तरी सिनेमामध्ये निर्माती म्हणून आपले नाव यावे, अशी आपली इच्छा आहे. त्या दृष्टीने एका सिनेमाची जुळवाजुळव सध्या सुरू असल्याचे कॅटने सांगितले.

आपल्या प्रॉडक्‍शन हाऊसचा पहिला सिनेमा म्हणून कतरिनाने एका फ्रेंच सिनेमा बनवण्याचे ठरवले आहे. “ही लव्हज मी, ही लव्हज मी नॉट’ असे या सिनेमाचे शिर्षक आहे. मात्र या प्रोजेक्‍टच्या कामाला यापूर्वी सुरुवात व्हायला पाहिजे होती. अद्याप या कामाला काही मुहूर्त मिळालेला नाही. अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी’मध्येही सध्या कतरिना काम करते आहे. हा सिनेमा संपल्यावर पुढचा सिनेमा कोणता करायचा किंवा प्रॉडक्‍शनमध्येच लक्ष घालायचे हे तिने अद्याप ठरवलेले नाही.

“भारत’ रिलीज झाल्यानंतरच ती याचा निर्णय घेणार आहे. प्रियांकाने हॉलीवूडमधील कामामुळे “भारत’मधून ऐनवेळी माघार घेतली होती. तेंव्हा कतरिनाला पुन्हाएकदा सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळाली. पण या रोलसाठी पूर्वतयारी करायला कतरिनाकडे खूपच कमी वेळ आहे, असे तेंव्हा सलमान म्हणाला होता. त्याला तर प्रियांकाच पाहिजे होती. तिच्यासाठी सलमान “भारत’च्या शूटिंग डेटही बदलायला तयार होता. “भारत’मध्ये कतरिनाने यावेच यासाठी सलमान किंवा डायरेक्‍टर कोणाकडूनही कतरिनावर फार प्रेशर आणले गेले नव्हते. डायरेक्‍टर अब्बास जफरनी एकदिवस स्क्रीप्ट पाठवली आणि प्रियांकाच्या जागेवर काम करायचे आहे, असे सांगितले. या सगळ्या गोष्टी आता “भारत’च्या प्रमोशनच्या निमित्ताने पुढे येत आहेत. पण तिच्या प्रॉडक्‍शन हाऊसमधील घडामोडींचा तपशील मात्र तिने अद्याप कोणालाच समजू दिलेला नाही. त्या फ्रेंच सिनेमाच्या शिर्षकानुसार त्याचे भविष्यही दोलायमान असावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)