‘…लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!’- सुप्रिया सुळे

पुणे – राज्याचे सत्ताकेंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. बारामतीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे. सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा तब्बल 1 लाख 54 हजार मतांनी दणदणीत पराभव केला. सुप्रिया यांनी 1 लाख 55,774 चे मताधिक्य मिळवून विजयाची हॅट्ट्रिक साधली.

लोकसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर, इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ‘श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!’ या ओळी त्यांनी ट्वीट केल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी कवितेतून शरद पवारांना ‘सलामी’ दिली आहे.

दरम्यान, पवार कुटुंबीयांच्याच नातेवाईक असलेल्या तसेच रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी सुरुवातीपासूनच सुळे यांच्यासमोर त्यांना तगडे आव्हान निर्माण केले होते. मात्र, या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना 6,86,714 तर कांचन कुल यांना 5,30, 940 मतं पडली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.