ओडिशामध्ये दोन बड्या भाजप नेत्यांचा पराभव

भुवनेश्वर – लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या दमदार विजयानंतर भाजपच्या गटामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अशातच भाजपचे दोन बड्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे माजी खासदार बैजयंत पांडा आणि प्रवक्ते संबित पात्रा यांचा पराभव झाला आहे.

केंद्रपाडा मतदारसंघातून खासदार अनुभव मोहंती यांनी १,५२,५८४ मतांच्या फरकाने बैजयंत पांडा यांचा पराभव केला. तर पुरी मतदारसंघातून बिजू जनता दलाचे खासदार पिनाकी मिश्र यांनी ११,७१४ मतांच्या फरकाने संबित पात्रा यांचा पराभव केला. मिश्र यांना २००९ आणि २०१४ मध्ये सोप्पा विजय मिळला होता. १९९६ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निडवणूक लढवली होती.

दरम्यान, २१ लोकसभा जागांपैकी बिजू जनता दलाने १२ जागांवर विजय मिळवला आहे. तर आठ जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. आणि काँग्रेसने कोराटपुर येथील जागा जिंकून आपले खाते उघडले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×