विकी कौशल आणि कतरिना कैफ नेहमी एकमेकांसाठी काहीतरी पोस्ट करतात. अशात विकी आणि सारा अली खान स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागले आहे. विकी आणि साराने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडली नाही.
दरम्यान, विकी कौशलची पत्नी कतरिना कैफने इन्स्टा स्टोरी शेअर करून विकीला पाठिंबा दिला आहे. विकीसाठी कतरीना चीअरलीडर बनली आणि चित्रपटाच्या रिलीजबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले, यावर विक्कीने कतरिनाच्या पोस्टवर वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्याने सर्व विकी कतरिनाच्या फॅन्सला आनंद झाला आहे.
विकीने इन्स्टा स्टोरीशेअर केली. पोस्टमध्ये लिहिले होते, “तू है तो मुझे फिर और क्या चाहिये.” विकीच्या चित्रपटासाठी कतरिना चीअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. नवऱ्याचेही कौतुक करण्यात आले होते. विकी कौशलनेही कतरिना कैफला त्याच प्रकारे चिअर केले.
कतरिना कैफ ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान खानसोबत दिसणार आहे. शाहरुख खानही कॅमिओमध्ये दिसणार आहे. याशिवाय कतरिना श्रीराम राघवनच्या ‘मेरी ख्रिसमस’मध्ये विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे, अभिनेत्री आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्रासोबत फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये दिसणार आहे. विकी कौशल मेघना गुलजारच्या ‘साम बहादूर’मध्ये फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रासोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या टीझरने याआधीच बरीच चर्चा केली आहे.