मुंबई – अभिनेत्री इलियाना डिक्रूझचे अद्याप लग्न झालेले नाही. मात्र लग्न न करताच ती गरोदर होणार आहे. एप्रिल महिन्यात तिने आई होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र या बाळाचे वडील कोण? असा प्रश्न अनेकदा तिला सोशल मीडियाद्वारे विचारण्यात आला. त्यानंतर पहिल्यांदाच तिने एका व्यक्तीसोबतचा डिनर डेटचा फोटो शेअर केला आहे.
इलियानाने इनस्टाग्रामवर एका व्यक्तीचा हात आपल्या हातात घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘माझी रोमान्सची कल्पना. त्याला शांतपणे जेवण करू देत नाही.’ यामध्ये इलियनाच्या हातावर डायमंड रिंगसुद्धा दिसत आहे. अनेकजण हा तिचा बॉयफ्रेंड असल्याचा अंदाज व्यक्त करत आहे. या फोटोमध्ये तिने त्या व्यक्तीचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे अद्यापही इलियानाचा बॉयफ्रेंड कोण हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
याआधी इलियाना डिक्रूझने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो शेअर केले होते. यापैकी एकामध्ये न्यू बॉर्न बेबीचा बॉडीसूट दिसते, ज्यावर ‘आता ऍडव्हेंचर सुरु’ असे लिहिले होते. त्याचवेळी दुसऱ्या फोटोमध्ये एक लॉकेट दिसत आहे, ज्यावर ‘मम’ अर्थात आई असे लिहिले आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने एक कॅप्शनही दिले होते. इलियानाने लिहिले, ‘कमिंग सून.. कांट वेट टू मीट यु माय लिटिल डार्लिंग’.
View this post on Instagram
इलियानाच्या या पोस्टनंतर अनेकांनी तिच्या होणाऱ्या बाळाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, इलियाना ही अभिनेत्री कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियन लॉरेंट मिशेलला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी माध्यमांसमोर कधीच त्याची कबुली दिली नाही.