बॉलीवूडची बार्बी डॉल लवकरच दक्षिणात्य सुपरस्टार प्रभासबरोबर दिसण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ आनंद यांच्या आगामी ऍक्शन सिनेमामध्ये प्रभासने काम करण्याचे मान्य केले आहे. या सिनेमाच्या मुद्द्यावर प्रभास आणि सिद्धार्थ आनंद यांच्यात चर्चादेखील झाली आहे. प्रभासने आपल्याकडून या सिनेमाला ग्रीन सिग्नल दाखवला आहे.
या सिनेमात आता कतरिना कैफची एन्ट्री होण्याची शक्यता आहे, असे समजले आहे. कतरिना कैफने यापूर्वी सिद्धार्थ आनंद यांच्या “बॅंग बॅंग’मध्ये काम केले होते. त्या सिनेमाला व्यवसायिक यश फारसे मिळाले नव्हते. सिद्धार्थ आनंद यांच्या सिनेमाबाबत कतरिनाशी चर्चा समाधानकारक झाली आहे.
तिच्याकडून होकार मिळाला तर प्रभास आणि कतरिना हे स्क्रीन शेअर करताना दिसू शकतील. प्रभासबरोबर हॉलीवूडमधील लिडींग ऍक्ट्रेसने अद्याप काम केलेले नाही. कतरिना ही त्यातली पहिली अभिनेत्री असेल.