ब्रिटिश अभिनेत्री केट बेकिंस्ले हिने ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार केला आहे, ज्यांनी तिला विचारले होते की, तू अशा पुरुषांना डेट का करते, जे तुझ्या मुलाच्या वयाचे आहेत.46 वर्षीय अभिनेत्री केटचे या वर्षाच्या प्रारंभीच्या काळात गुडी ग्रेस या 23 वर्षीय युवकासोबत नाव जोडण्यात आले होते आणि तेव्हापासून त्यांच्या रोमांसच्या चर्चांना उत आला आहे. लॉकडाऊनच्या काळात तिने आपल्या प्रियकराचा 23वा वाढदिवसही साजरा केला होता.
यावेळी एका सोशल मीडिया यूझरने प्रश्न विचारला की, तू अशा लोकांना डेट का करत आहे जे तुझ्या मुलाच्या वयाचे आहेत. यावर 21 वर्षीय मुलीची आई असलेल्या बेकिंस्लेने त्याला चोख प्रत्तुतर दिले आहे. केट म्हणाली, माझ्या प्रत्येक नात्यामुळे तुम्हाला का त्रास होत आहे.
दरम्यान, “अंडरवर्ल्ड’ स्टार असलेल्या केटचे यापूर्वी कॉमेडियन पीट डेव्हिडसन (25) याच्याशी संबंध होते. तसेच गतवर्षी 24 वर्षीय अभिनेता मॅट राईफसोबत काही काळ तिचा रोमांस सुरू होता. याशिवाय 2018 मध्येही 31 वर्षीय कॉमेडियन जॅक व्हाइटहॉलसोबतच्या संबंधामुळे केट बेकिंस्ले प्रसिद्धीच्या झोतात आली होती.