सासवड -शहरात शनिवार (दि.4) पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत 2 रूग्णांची भर पडली आहे. तालुक्यातील एकूण 101 करोना रुग्णांच्या संख्येने शतक पार केले आहे.
दोन रुग्णांपैकी एक रुग्ण नेताजी चौक परिसरातील किराणा मालाचे व्यापारी आहेत. त्याच्या संपर्कातील 3 जण हाय रिस्क व लो रिस्क संपर्कातील 2 जण आहेत. दुसरा रुग्ण हा सासवड येथील एका खासगी रुग्णालयातील 29 वर्षीय तरूण कर्मचारी आहे.
रुग्णाचे हाय रिस्क संपर्कातील 1 जण आहे. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली आहे. धनकवडी येथे आणखी एकास लागण झाली आहे