बॉलीवूडमधील युवा अभिनेता कार्तिक आर्यनने खुपच कमी कालावधीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कार्तिकने आपल्या दमदार अभिनयाच्या मदतीने अनेक नवीन चित्रपट साईन केले आहेत. आता त्याने साजिद नाडियाडवाला याचाही एक चित्रपट साइन केला आहे.
View this post on Instagram
हा चित्रपट पूर्णपणे कर्मशिअल असणार असून तो एका सत्य घटनेवर असलेला एक देशभक्ति चित्रपट असणार आहे. या चित्रपटात कार्तिक हा एका एयरफोर्स पायलटच्या भूमिकेत झळकणार आहे. यात तो एका रेस्क्यू ऑपरेशनचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कार्तिकचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. तो अनीस बझ्मीच्या हॉरर कॉमेडी “भूल भुलैया-2′ चित्रपटामुळेही चर्चेत आहे. याशिवाय तो “धमाका’ आणि “लुका छुपी-2’मध्येही मुख्य भूमिका साकारणार आहे.
View this post on Instagram