बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. तो बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जात आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले असून त्याच्याकडे सध्या अनेक प्रॉजेक्ट्स आहेत. त्यातच त्याने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले असून या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांशी व्यक्तिगत वर्क लाईफशी संबंधीत अपडेट्स देत असतो.
कार्तिकने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून यात तो एका जाहिरातीची शूटिंग करताना दिसत आहे. यात एथनिक लुकमध्ये कार्तिक सेटवर इंजॉय करताना झळकत आहे. तसेच तो आपल्या क्रू सोबत उपस्थितांशी चर्चा करत त्यांना एंटरटेन करत असताना दिसतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेक चाहत्यांनी त्यावर कॉमेट्स देत कार्तिकला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास कार्तिक “पति पत्नी और वो’, “आज कल’ आणि “भूल भुलैया-2′ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. “पति पत्नी और वो’मध्ये त्याच्यासोब अनन्या पांडे आणि भूमि पेडणेकर, तर “आज कल’मध्ये सारा अली खानसोबत तो काम करत आहे. याशिवाय “भूल भुलैया-2’मध्ये कियारा आडवाणी त्याच्यासोबत पडद्यावर झळकणार आहे.